याउलट सरकार ज्या खुल्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य देऊन ' चंगळवादी ' दृष्टिकोन रुजवतेय ते त्यांनी करायला नकोय .... भोगवादी / चंगळवादी जिवनव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या साधनांचं नियंत्रण कुणाच्या हातात आहे ...? तुम्हि विष पेरणार आणि अमृत उगवण्याच्या थोतांडाचा प्रचार करणं थांबवावं ! बलात्कार होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणं म्हणजे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेने निर्माण केलेल्या शासनरचनेच्या कायदा व सुव्यवस्थेतल्या त्यांच्या अपयशाकडे डोळेझाक करणे आहे . कपड्यांपेक्षा ' माणसिकता ' बदलण्यासंदर्भात कृती करणारी रचना व यंत्रणा समाजमनाने बनवायला हवी . चौकात ऊभा राहून छेड काढण्याचा घटनेचा गुन्हा किंवा तत्सम गुन्ह्यांना जेव्हा सत्ताधारी ( किंवा बिगरसत्ताधारीही ! ) नेते / पुढारी पाठीशी घालतात तेव्हा ते विकृतीला अभय देत असतात . त्यांच्या खुर्च्यांचे भविष्य ह्या गुन्हेगारांनी प्रचारात निभावलेल्या भुमिकेवर अवलंबून असते . गुन्हेगार आईच्या पोटातून गुन्हेगार म्हणून जन्मत नाही ; तर इथली समाजरचना त्याला तशी घडवते .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असं न होण्याचं कारण फक्त स्त्रियांच्या कपड्यांना दिलं तर मग त्यांच्या कायदा व सुव्यवस्था आणि ' अशीच आमची माय असति सुंदर रुपवती .... ' ह्या संस्कारांचे काय ....? त्यांनी निर्माण केलेल्या सुराज्यात असं होत होतं काय ?
घराघरात शिवाजी रुजावा यासाठी संस्कार व्हावेत .... दबलेल्या माणसिकतांना मोकळं होण्यासाठी ढोंगी / भ्रामक ' सांस्कृतिक ' साखळदंडाना तोडून टाकावं , बाजारपेठीय / भांडवलदारी हितसंबंध जोपासणाऱ्या सत्तासंबंधाना मुठमाती द्यावी ......
मूळ मुद्द्यावरुन लक्ष उठावे यासाठी खुपदा चुकीचा प्रचारसुद्धा घडवून आणला जातो ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा